शेळ्या मधील खुरसडा (कारणे व उपयोजना)

शेळ्या मधील खुरसडा             (कारणे व उपयोजना)

          मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय निश्चितच हमखास उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. शेळीपालन करत असताना शेळ्यांचे खाद्य, निवारा, प्रजननाचे व्यवस्थापन या महत्वाच्या गोष्टींची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय शेळ्यांमध्ये होणारे सर्वसामान्य आजार याबाबतही ज्ञान असणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांमध्ये खुरसडा हा आजार आढळतो या आजाराविषयीची थोडक्यात पण महत्वाची माहिती.

खुरसडा काय आहे- जिवाणूमुळे होणारा हा आजार शेळ्यामध्ये आढळतो. यामध्ये मुख्य करून दोन खुराच्या मधील जो भाग असतो यात जंतू संसर्ग होतो. त्यामध्ये सुरुवातीला सूज येते व हळू हळू तो भाग सडायला सुरु होतो व शेवटी खुरे निकामी होतात.
याची लक्षणे काय असतात – हा आजार सुरु झाल्यावर शेळ्या लंगडत चालतात किंवा जागेवर उभ्या असतील तर ज्या खुराला सूज आहे तो पाय हळुवार वर उचलून घेतात. यासोबतच शेळ्यांचे वजन झपाट्याने कमी होते.

उपाय
१. पावसाळ्याच्या दिवसात चरायला जाणाऱ्या शेळ्यांसाठी foot wash चा वापर करणे आवश्यक आहे. Foot wash साठी पोट्याशियम परम्यांगनेट व झिंक सल्फेट च्या द्रावणाचा वापर करणे योग्य आहे. त्याचप्रमाणे शेड च्या प्रवेशद्वारावर २% फोर्मालीन द्रावण वापरून foot deep चा वापर करावा. शेळ्या मध्ये खुर सड्याची लक्षणे असो किंवा नसो वरील उपाय करणे आवश्यक आहे.
२. ज्या शेळ्यामध्ये लक्षणे दिसून येत आहेत त्यांना चरायला बाहेर सोडू नये. त्यांना खाद्य व पाणी जागेवर द्यावे कारण चरत असताना खुराला जखम होऊ शकते.
३. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत तसेच बरे झालेल्या शेळ्यांना लगेच चरायला न सोडता ३ ते ४ दिवस शेड मधेच चारा पाणी द्यावे. आजारा दरम्यान खुराकाचे प्रमाण वाढवल्यास शेळ्या लवकर बऱ्या होतात.
प्रतिबंध-
१. शेळ्यांच्या खुर जर जास्तीचे वाढलेले असतील तर ते वेळोवेळी कापून काढावेत.
२. खुराच्या वरच्या बाजूचे केस जास्त वाढलेले असतील तर ते कापून काढावेत कारण यामध्ये घाण साचून नंतर खुराला संसर्ग होतो.
३. खुराच्या मध्ये सूज आलेली आढळल्यास माश्या बसू नयेत किंवा अळ्या/किडे होऊ नयेत म्हणून topicure स्प्रे मारावा.


*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!