कुक्कुटपालन व्यवसायात प्रकाशाचे महत्व

कुक्कुटपालन व्यवसायात प्रकाशाचे महत्व
              मित्रांनो, मागील  लेखात आपण कुक्कुटपालन करत असताना शेड, पाण्याची व्यवस्था याबद्दल प्राथमिक माहिती पाहिली आहे. या भागात आपण कुक्कुटपालन उद्योगात असणारे प्रकाशाचे महत्व पाहणार आहोत.
प्रकाशाचा परिणाम– प्रकाशाची प्रखरता, कालावधी आणि रंग पक्षांच्या वर्तन, चयापचय आणि अंडी देण्याची क्षमता यावर परिणाम करतात, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपण बारकाईने जर निरीक्षण केले असेल तर कोंबडीचे डोळे हे तुलनेने पसरट असतात जेणेकरून पुरेसा प्रकाश आतपर्यंत पोहोचेल. डोळ्याव्यतिरिक्त पक्षाच्या कवटीमधून व त्वचेमधून प्रकाश आतमध्ये जात असतो. मेंदूमध्ये असणाऱ्या पिनेअल ग्रंथी व हायपोथालामस भागास व्यवस्थित कार्य करण्यासाठी प्रकाशाची गरज असते. थोडक्यात, पक्षाच्या शरीरावर पडणारा प्रकाश त्यांच्या डोळ्यातून आणि कवटी मधून आत जाऊन त्यांच्या प्रजनन क्षमता आणि वाढीवर परिणाम करत असतो.

अंडी उत्पादनात प्रकाशाचे महत्व- डोळ्यावाटे आत जाणारा प्रकाश, ऑप्टिक मज्जातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो व तेथे तो पिटूटरी ग्रंथीला सक्रीय करतो. याचा परिणाम म्हणून, follicle stimulating hormone (FSH) आणि Luteinizing hormone  स्रवतात. ज्यांच्याशिवाय शरीरात अंडी तयार होऊ शकत नाहीत. म्हणून ज्या लेयर फार्म मध्ये प्रकाशाच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालेले असते त्या ठिकाणी हमकास उत्पादन कमी झाल्याची तक्रार असते.  

आपल्या शेड प्रकाश व्यवस्था करताना लक्षात ठेवायच्या बाबी-

१.       चांगल्या प्रतीचे आणि गरजेनुसार बल्ब वापरावेत. उदा, ज्या ठिकाणी उबीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी गरम होणारे बल्ब व निव्वळ प्रकाशासाठी एल इ डी बल्ब वापरावेत.

२.       बल्ब लावत असताना त्याचा प्रकाश पक्ष्यांवर तसेच जमिनीवर पडेल असे पाहावे.

३.     बल्बला रेफ्लेकटर लावावेत व ते लावताना ते पसरट असावेत जेणेकरून जास्त जागा कव्हर होईल. शंकूच्या आकाराचे रेफ्लेकटर वापरल्यास त्यातून परावर्तीत होणारा प्रकाश जास्त जागा कव्हर करत नाही.

४.     बल्ब लावत असताना योग्य अंतरावर तसेच उंचीवर लावावेत. उदा. दोन बल्ब मधील अंतर हे पक्षी व  बल्ब यातील उंचीच्या दीडपट असावे.

५.     शेडमध्ये दैनंदिन कामात उडणारी धूळ बल्बवर बसते व त्यामुळे त्यातून येणारा प्रकाश हळूहळू कमी होतो. हे टाळण्यासाठी  किमान २ आठवड्यातून एकदा सर्व बल्ब पुसून स्वच्छ करावेत.

अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा.

आवडल्यास खालील बटन वापरून आपल्या मित्रांना share करा ....

प्रतिक्रिया कळवा, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स वापरा...
Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!