पशुमधील अखाद्य भक्षण व त्याची उपाययोजना

पशुमधील अखाद्य भक्षण व त्याची उपाययोजना
           पशुपालक मित्रांनो, आपल्याकडे असणाऱ्या पशूंमध्ये प्लास्टिक, कापड, दोऱ्या इ. अपचनीय गोष्टी खाण्याची समस्या आपल्याला माहित असणारच. बऱ्याच वेळी आपल्याला असा प्रश्न पडत असेल की, कोणत्या कारणामुळे ही समस्या होत आहे, पण नेमके उत्तर मिळत नसणार. आपण या भागात त्याचविषयी माहिती घेणार आहोत. इंग्रजी मध्ये याला vice असे म्हणतात याचा अर्थ ‘दुर्गुण’ किंवा ‘वाईट सवय,  असा आहे. जनावरामध्ये असणाऱ्या अनेक दुर्गुणापैकी हा एक महत्वाचा दुर्गुण. वेळीच जर ही समस्या आटोक्यात नाही आणली तर असे पदार्थ जनावराच्या पोटात साठून राहतात व अन्नपचनाची प्रक्रिया बंद होऊन जनावर दगावू शकतात.

प्रमुख लक्षणे-१.     सुरुवातीच्या काळात जनावरे विशेष विशेष लक्षणे दाखवत नाहीत. मात्र हळूहळू त्यांची तब्येत खालावत जाते.२.     जनावरे चाऱ्या व्यतिरिक्त इतर वस्तू चघळत राहतात जसे की, प्लास्टिक, दोरखंड, कापड, वायर, शेण अगदी काहीही. ३.     त्यांनतर भुकेवर परिणाम होतो आणि त्याचे पोट फुगणे, रवंथ बंद/कमी होणे, हगवण लागणे असे प्रकार सुरु होतात.

यामागची प्रमुख कारणे-

१.     आहारात तंतुमय पदार्थांचा अभाव- चारयामध्ये जर कडब्याचे प्रमाण कमी असेल तर ही लक्षणे दिसतात

२.     अन्नद्रव्याची कमतरता- जनावरांना जर संतुलित खाद्य मिळत नसेल तर त्यांच्या शरीरात प्रामुख्याने पोटॅशियम, फोस्फोरस लोह, सोडियम, मॅग्नेसियम या महत्वाच्या घटकांची कमतरता निर्माण होते त्यामुळे जनावरांच्या भुकेवर परिणाम होतो व त्यांच्यात अशी लक्षणे निर्माण होतात

३.     पोटात जंत असणे- जर आपल्या जनावरांना नियमितपणे जंतनाशक औषधे पाजली जात नसतील तर त्यांच्या पोटात जंतांची वाढ होते व त्यामुळे जनावरांची वाढ व्यवस्थित होत नाही. कारण जंत त्यांच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी प्राण्याच्या शरीरातील अन्नद्रव्ये वापरतात.

४.     इतरांचे अनुकरण- बऱ्याच वेळी वरील कारणाशिवाय सुद्धा जनावरात ही समस्या निर्माण होते, गोठ्यात जर एखादे जनावर असे करत असतील तर इतर जनावरात देखील ही सवय पसरते.

हे टाळण्यासाठी काय करावे-

१.     सर्वप्रथम आपण जनावरांना संतुलित खाद्य खायला देतो का ते तपासावे. म्हणजेच त्यांना हिरवा चारा, कडबा, खुराक, पेंड, क्षारमिश्राने इ योग्य त्या प्रमाणात मिळतात का ते पाहावे.

२.     नियमितपणे जंतनाशक औषधे पाजावीत.

३.     कळपात जर एखादे जनावरात असे लक्षण आढळून येत असेल, तर त्याला इतर जनावरापासून काही दिवस वेगळे ठेवावे

४.     वरील उपाय करूनसुद्धा ही समस्या आटोक्यात येत नसेल तर मात्र पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

बऱ्याच ठिकाणी यावरचा उपचार म्हणून जनावरांना तोंडावर चटका देणे किंवा काठीने/चाबकाने मारणे असे अघोरी प्रकार केले जातात. यामध्ये फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. त्यामुळे असे प्रकार करू नयेत.                       

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!