हळदी मधील निळ्या फुलाच्या गवतामुळे जनावरात होणारी विषबाधा 

हळदी मधील निळ्या फुलाच्या गवतामुळे जनावरात होणारी विषबाधा 
            पशुपालक मित्रांनो, महाराष्ट्रात हळदीची लागवड बऱ्याच जिल्ह्याध्ये केली जाते. हळदीचे पीक शिवारात असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे तणदेखील उगवते यापैकीच एक निळ्या फुलाचे गवत आपल्या पाहण्यात निश्चितच असणार. याची फुले सुंदर दिसतात तरीपण हे गवत आपल्या पशुधनासाठी अतिशय घातक आहे हे लक्षात घेतलेले बरे राहील.

काय आहे हे गवत- Anagallis arvensis ह्या प्रकारातील ही वनस्पती असून स्थानिक भागात याची वेगवेगळी नावे आहेत.

गवतामध्ये असणारे विषारी घटक – ह्या गवताचा मुळ्यापासून ते फुलापर्यंत प्रत्येक भाग विषारी आहे. यात अनेक प्रकारचे विषारी घटक असून, त्यांपैकी ऑक्झालेट आणि ग्लायकोसाइड हे प्रमुख आहेत

कुणाकुणाला विषबाधा होऊ शकते-  मेंढ्या, शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या, घोडा, ससे इ.

जनावरात दिसणारी लक्षणे

१.           भूक मंदावणे

२.           रवंथ थांबणे

३.           लघवी बंद होणे

४.           मागचा दोन पायातील भागात सूज येणे

५.           जास्त प्रमाणात जर खाल्लेले असेल तर जनावर दगावते  

विषबाधा टाळण्यासाठी काय करता येईल

१.     बांधावर आणि पिकात निरीक्षण करावे व अशा प्रकारचे गवत असल्यास त्वरित काढावे

२.     या गवताच्या विषबाधेमुळे मेंढ्या लवकर दगावतात त्यामुळे असे गवत असलेल्या ठिकाणी चरायला सोडू नये.

३.     चारा कापून आणल्यानंतर त्यामध्ये हे निळ्या फुलाचे गवत नाही याची खात्री करावी आणि मगच ते जनावरांना खायला द्यावे.

४.     वरील लक्षणे दिसल्यास तसेच असे गवत खाण्यात आल्याचे समजल्यास त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

(लेखक- डॉ अजय मुस्तरे, MVSc)

आपल्याला वरील माहिती महत्वाची आहे असे वाटत असल्यास खालील बटन वापरून आपल्या मित्रांसोबत facebook वर नक्की share करा. शंका असतील तर कमेंट बॉक्स वापरा.

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!