गारपीट, वादळादरम्यान पशुधनाची काळजी कशी घ्यावी?

गारपीट, वादळादरम्यान पशुधनाची काळजी कशी घ्यावी?

           पशुपालक मित्रांनो, वादळ आणि  गारपिटीने शेतीचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान होते. आपण वेळीच पूर्वतयारी केली तर गारपिटीमुळे आपल्या पशुधनाचे होणारे नुकसान टळू शकते.

गारेचा आकार, त्या पडण्याचे प्रमाण आणि वाऱ्याचा वेग या तीन गोष्टींवर त्यांची नुकसान करण्याची क्षमता अवलंबून असते. जनावरे गारपीटीत सापडली तर त्यांना मोठ्या प्रमाणात इजा होते. गाई-म्हशीत त्वचेवर मोठा मार बसतो व इजा होऊन सूज येते, शिंगे मोडणे, डोळे निकामी होणे इ गोष्टी घडतात. लहान वासरे, शेळ्या व मेंढ्या मोठ्या जनावराच्या तुलनेने गारपीटीस जास्त बळी पडतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कोणती उपाययोजना कराल?

१. प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावरासाठी पक्का गोठा असतोच असे नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे गोठा नाही त्यांनी जनावरांसाठी तात्पुरता का होईना आडोसा तयार करावा. त्यासाठी जास्त खर्चात न पडता आपल्या शेतात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरता येऊ शकतात

२. ज्यांच्याकडे पक्का गोठा आहे त्यांनी सावध राहावे व गारपीट होईल असा अंदाज असल्यास तात्काळ जनावरे गोठ्यात बांधावीत

३. मुक्त संचार गोठा असणारयांनी सुद्धा या दरम्यान आपल्या पशूंना बांधून ठेवलेले बरे राहील, कारण अचानक वादळ आणि गारपीट सुरु झाल्यास जनावरे घाबरून जातात आणि त्यांना नुकसान होऊ शकते

४. यादरम्यान गोठ्यातच पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध ठेवा

५. ज्या ठिकाणी आडोसा उपलब्ध नाही अशा शिवारात जनावरे शक्यतो चरायला सोडू नये तसेच गारपीट सुरु झाल्यास झाडांचा आधार अजिबात घेऊन नये कारण गारपीट सुरु असताना वादळी वारा आणि विजा पडण्याची शक्यता अधिक असते

६. गारपीट झाल्यास हवेत अचानक गारवा येतो त्यामुळे लहान वासरे व शेळ्या-मेंढ्या आजारी पडतात हे टाळण्यासाठी गोठ्यामध्ये ऊब राहील अशी व्यवस्था करावी

७. या कालावधीत हवामान खात्याच्या बातम्याबाबत अपडेट राहावे

८. याउपरही जर गारपीटीत जनावरे सापडली तर लागलीच पशुवैद्यकास संपर्क करून उपचार करून घ्यावेत जेणेकरून जनावरांच्या जीवावर बेतणार नाही.

 
आपल्याला वरील माहिती महत्वाची आहे असे वाटत असल्यास खालील बटन वापरून आपल्या मित्रांसोबत facebook वर नक्की share करा. शंका असतील तर कमेंट बॉक्स वापरा.

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!