कुक्कुट पालन- पक्षीगृहात खाद्याच्या भांड्याची योग्य मांडणी आणि व्यवस्थापन 

कुक्कुट पालन- पक्षीगृहात खाद्याच्या भांड्याची योग्य मांडणी आणि व्यवस्थापन 
                 शेतकरी बंधुनो, कुक्कुटपालन करीत असताना होणाऱ्या खर्चापैकी खाद्यावर होणारा खर्च हा सर्वात जास्त असतो त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. सर्व पक्षांना त्यांच्या गरजेनुसार खाद्य मिळणे तसेच ते वायाही न जाणे ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला खाद्याची भांडी घ्यावी लागतात, परंतु ही भांडी जर पक्षीगृहात योग्य प्रकारे ठेवली नाहीत तर बरेच खाद्य वाया तर जातेच पण पक्षांना योग्य तेवढा आहार न मिळाल्याने त्यांचे वजन वाढत नाही व परिणामी आपले आर्थिक नुकसान होते.

खाद्याची भांडी विकत घेताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात

१.     भांडी विकत घेताना ती चांगल्या दर्जाची आहेत का ते तपासावे कारण भांडी दीर्घकाळ टिकणारी असल्यास पुन्हा पुन्हा पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

२.     भांडी शक्यतो प्लास्टिकची असावीत जेणेकरून ती गंजणार नाहीत, तसेच वजनाने हलकी असतील.

३.     चांगल्या दर्जाचे प्लास्टिक वापरलेले असणे आवश्यक आहे, जेणेकरून ती बऱ्यापैकी चिवट असतील, सहजासहजी तुटणार नाहीत, तसेच उष्णतेमुळे ती खराब होणार नाहीत.

४.     भांडी अर्धपारदर्शक असावीत, जेणेकरून आतमध्ये किती खाद्य आहे याचा अंदाज बाहेरूनच घेता येईल.

५.     भांडी रंगीत (लाल) असावीत, जेणेकरून पक्षी त्यांच्याकडे आकर्षित होतील (लहान पिलासाठी हे फार महत्वाचे आहे).

६.     भांड्यांना पकडण्यासाठी मुठ किंवा दांडा असावा, जेणेकरून ती साफ करत असताना मदत होईल.

७.     भांड्याचे सुटे भाग एकमेकात व्यवस्थित बसणारे असावेत.

८.     भांड्याला खाद्याचे प्रमाण adjust करायची सोय असावी जेणेकरून गरजेनुसार खाद्य देता येईल व खाद्याची नासाडी टाळता येईल.

९.     भांडी विकत घेताना पक्षांचे वय तसेच संख्या ह्या गोष्टी विचारात घेऊनच खरेदी करावी.

भांडी विकत घेतल्यावर, पक्षीगृहात ती व्यवस्थितपणे ठेवावीत, तसेच दोन भांडयामधील  अंतर, त्यांचे प्रमाण हे शास्त्रीय पद्धतीनेच असावे.

त्यांची रचना, स्वच्छता याबाबत अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा.

आपल्याला वरील माहिती महत्वाची आहे असे वाटत असल्यास खालील बटन वापरून आपल्या मित्रांसोबत facebook वर नक्की share करा. शंका असतील तर कमेंट बॉक्स वापरा.

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!