कुक्कुटपालन-ब्रॉयलर पक्ष्यांचे लसीकरण व ते करताना घ्यावयाची काळजी

कुक्कुटपालन-ब्रॉयलर पक्ष्यांचे लसीकरण व ते करताना घ्यावयाची काळजी
          कमी कालावधीत, झटपट पैसे मिळवून देणारा उद्योग म्हणून ब्रॉयलर पक्षी पाळले जातात. सहा ते आठ आठवड्यात याची एक batch बाहेर पडते. या कालावधी दरम्यान शेड, खाद्य, पाणी, तापमान इ गोष्टी चांगल्या रीतीने पुरवणे गरजेचे असतेच पण पिल्लांची मरतुक होऊ नये तसेच त्यांचे वजन भरून चांगला FCR मिळावा यासाठी त्यांना रोगापासून वाचवणे पण आवश्यक आहे. यासाठी त्यांना ४ वेळा लसीकरण करणे आवश्यक आहे.
त्या लसी खालीलप्रमाणे दिल्या पाहिजेत.

१.      मरेक्स- ही लस एक दिवस वय असलेल्या पिल्लांना देतात. त्यामुळे पिल्लं विकत घेत असताना ही लस दिलेली आहे का याची खात्री करून घ्यावी.

२.      मानमोडी- लासोटा नावाची ही लस पिल्लं ७ दिवसाची झाल्यावर देतात. डोळ्यावाटे किंवा नाकातून ही लस दिली जाते.

३.      गम्बोरो- पिल्लं १४ दिवसाची झाल्यावर ही लस दिली जाते. पिण्याच्या पाण्यातून ही लस देतात.

४.      मानमोडी चा बुस्टर- साधारण २१ दिवसांनी मानमोडीची दुसरी लस दिली जाते ही सुद्धा पाण्यातून देतात.

५.      गम्बोरो चा बुस्टर- २८ दिवसांनी ही लस पाण्यातून देतात.

लक्षात ठेवा-

१.      लसीकरण अत्यावश्यक बाबीपैकी आहे त्यामुळे ते टाळू नये.

२.      लस ही चांगल्या प्रतीची असावी.

३.      लस आणि diluent २-८ अंश सेल्सिअस तापमान असतानाच व्यवस्थितपणे मिसळावे.

४.      लसीची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी शीत साखळी (cold chain) म्हणजे  २-८ अंश सेल्सिअस तापमान (फ्रीज च्या दाराला असलेल्या कप्प्यात हे तापमान असते) कटाक्षाने पाळावे. तसेच लस गोठवणे व उन्हाशी संपर्क इ गोष्टी टाळाव्यात.

५.      डोळ्यातून द्यावयाच्या लसी देताना कंपनीने सोबत दिलेल्या सूचना वाचाव्यात व त्या नीट समजून घेऊनच सुरुवात करावी. कारण चुकीच्या पद्धतीने डोळ्यात/नाकात द्यायची लस दिली गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

६.      dropper ने नाकातून किंवा डोळ्यात लस देताना drop पूर्णपणे आत गेल्याची खात्री झाल्याशिवाय पुढे जाऊ नये. कारण योग्य मात्रा जर मिळाली नाही तर फायदा होत नाही.

७.      डोळ्यातून / नाकातून द्यायच्या लसी,सायंकाळी किंवा सका-ळी लवकर द्याव्यात यादरम्यान तापमान कमी असल्याने पिल्लं हाताळताना पिल्लांवर स्ट्रेस येत नाही.

८.      पाण्यातून द्यायच्या लसी देताना साधारणपणे १ तास आधी पिल्लांचे पाणी बंद करावे.

९.      पिल्लांना दिवसभरात लागणाऱ्या पाण्याच्या अंदाज घ्यावा व त्याच्या ३०% पाण्यामध्ये लस मिसळावी जेणेकरून लस वाया जाणार नाही व योग्य प्रमाणात सर्वांना मिळेल.

१०.     पाण्यातून लस देत असताना शेड मध्ये सर्व पक्षी पाणी पीत असल्याची खात्री करावी.

आपल्याला वरील माहिती महत्वाची आहे असे वाटत असल्यास खालील बटन वापरून आपल्या मित्रांसोबत facebook वर नक्की share करा. शंका असतील तर कमेंट बॉक्स वापरा. अधिक माहितीसाठी कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांचे व्हिडियो (4min36sec पहा

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!