कमी खर्चात पक्षीगृहाची रचना- कुक्कुटपालन

कमी खर्चात पक्षीगृहाची रचना- कुक्कुटपालन
                मित्रांनो, कुक्कुटपालन  उद्योग  सुरु करायचा असेल तर भांडवलाची गरज असतेच. अशा वेळी आपण सूक्ष्म नियोजन केले तरच आपल्याकडे असलेले भांडवल आपल्याला प्रभावीपणे वापरता येते व महत्वाच्या गोष्टीसाठी पैशाची कमतरता भासत नाही.  व्यावसायिक कुक्कुटपालन करत असताना बंदिस्त पद्धतीने करावे लागते म्हणजेच आपल्याला शेडची (पक्षीगृहाची) आवश्यकता असते. शेड बांधत असताना सुरुवातीला कमी खर्चात, आपल्याकडे सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून जर बांधकाम केले तर कमी खर्चात आपण चांगल्या स्वरूपाचे शेड बांधू शकतो.

चांगले शेड असेल तर खालील गोष्टी साध्य होतात 

१. पक्षांना आरामदायी वातावरण मिळाल्यामुळे त्यांच्यावर स्ट्रेस येत नाही व ते आजारास बळी पडत नाहीत

२. कुत्रा, मांजर, रानटी प्राणी व पक्षी यांच्यापासून संरक्षण मिळते

३. कमी जागेचाही व्यवस्थित वापर करता येतो

४. शेड मध्ये दैनंदिन कामे सहजपणे करता येतात

५. पक्ष्यांची अपेक्षेनुसार वाढ होते.

शेड बांधत असताना खालील गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे

१. शेड ची जागा – कुक्कुटपालन उद्योग सुरु करत असताना योग्य जागा निश्चित करणे आवश्यक आहे. बाजारपेठ, रस्ता, माणसाची वस्ती, Bio security (जैव सुरक्षा ) इ. गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

२. शेडचे आकारमान- एक प्रौढ पक्षाला साधारण १.२ चौरस फुट एवढी जागा लागते. आपल्या आवश्यकतेनुसार शेडचे बांधकाम करावे.

३. शेडसाठी लागणारे बांधकाम साहित्य- वर सांगितल्या प्रमाणेच आपल्या स्थानिक हवामान लक्षात घेऊन कमी खर्चात चांगले शेड बांधता येऊ शकते.

प्रस्तुत व्हिडियोमध्ये अशा अनेक बाबींविषयी  कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांनी थोडक्यात सांगितले आहे कुक्कुटपालकांना त्याचा निश्चितच लाभ होईल.

आपल्या मित्रांना share करा

 

 

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!